पारा पोहोचला 35 अंशांवर; उन्हाचा तडाखा वाढला

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा पारा पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी, दि. 2 मार्च रोजी कमाल तापमान 35 अंशांवर पोहोचल्याची नोंद झाली आहे. रविवारीदेखील तापमान 34 अंश नोंदवले गेले होते.
गेल्या काही दिवसांपासून किमान आणि कमाल तापमानात घसरण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. शहरात शुक्रवारी वार्‍याचा वेग होता. दिवसभर वारा वेगाने वाहत होता. शनिवारीही रात्रीही वातावरणात गारवा होता. मात्र, रविवारी दुपारनंतर वातावणातील उकाडा वाढण्यास सुरवात झाली. सोमवारीही कमाल तापमान 35 अंशांवर पोहोचल्याने दुपारच्या वेळी उन्हाची दाहकता नागरिकांना जाणवत होती. किमान तापमानाही एक अंशाने वाढ झाली आहे. तापमानातील चढउताराचा आरोग्यावर परिणाम होत आहे. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने 35 अंश सेल्सिअस गाठल्याने मार्चच्या मध्यात व एप्रिल, मे महिन्यात उन्हाळा अधिक उष्ण जाणवेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

The mercury reached 35 degrees; the heat of the sun increased

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *