सेवानिवृत्त आरटीओ अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या
सिटी सेंटर मॉल परिसरातील राहत्या घरात मध्यरात्रीची घटना; आत्महत्येमागे कौटुंबिक कारण असल्याची प्राथमिक माहिती
सिडको : दिलीपराज सोनार
सेवानिवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) हेमंत गोविंद हेमाडे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सिटी सेंटर मॉल परिसरातील त्यांच्या राहत्या घरात शुक्रवारी (दि. २०) मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक कारणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी कौटुंबिक कारणातून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असुन , पोलीस पुढील तपास करीत आहेत.