मिळणार 76 लाखांचा विकासनिधी
नाशिक : प्रतिनिधी
महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात नगरसेवकांसाठी प्रभाग विकासनिधी, स्वेच्छा निधीसाठी तरतूद केली आहे. त्यानुसार निवडून आलेल्या 122 आणि स्वीकृत दहा, अशा 132 नगरसेवकांना प्रभाग विकासनिधी व स्वेच्छा निधी मिळणार आहे. दरम्यान, नवनिर्वाचित नगरसेवकांना लॉटरी लागली असून, चालू वर्षाप्रमाणेच गेल्या वर्षीचादेखील प्रभाग विकासनिधी व स्वेच्छा निधी मिळणार आहे. त्यामुळे नगरसेवकांना 76 लाखांचा निधी मिळेल. एकूण ही रक्कम 100.32 कोटींच्या घरात जाणार आहे. यामुळे नगरसेवकांना
प्रभागातील कामे मार्गी लावता येतील.
सन 2025-26 या वर्षात प्रत्येकी 30 लाख, तर 2 टक्के प्रतिनगरसेवकास आठ लाख स्वेच्छा नगरसेवक निधी, अशी 132 नगरसेवकांसाठी तरतूद करण्यात आली आहे. 2026-27 या आर्थिक वर्षातही अंदाजपत्रकात नगरसेवकांना प्रभाग विकास निधीसाठी 30 लाखांप्रमाणे 39.56 कोटी, तर नगरसेवक स्वेच्छा निधी म्हणून 10.56 कोटींचा निधी मिळणार आहे. अशी दोन वर्षे मिळून नगरसेवकांना प्रत्येकी 76 लाख निधी मिळणार आहे. 132 नगरसेवकांना एकूण 100.32 कोटींचा निधी मिळेल. चार वषार्ंनंतर प्रशासकीय राजवट संपुष्टात आली.
दरम्यान, सोमवारी आयुक्त मनीषा खत्री यांनी सोमवारी (दि.2) सादर केलेल्या 2026-27 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात प्रतिनगरसेवकासाठी दोन वर्षांची मिळून 100.32 कोटींची तरतूद केली आहे. प्रशासकीय राजवट असल्यामुळे नगरसेवकांच्या प्रभाग विकासासाठी तरतूद केलेला निधी खर्ची पडत नव्हता. नगरसेवकच नसल्यामुळे प्रभागात रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, विद्युत अशा कामांसाठी लोकांच्या मागण्या प्रशासनामार्फत पोहोचत नव्हत्या.
स्वीकृत सदस्यांचीही हवा
नागरिकांंमधून निवडून आलेल्या नगरसेवकांप्रमाणेच स्वीकृत नगरसेवकांनादेखील त्यांच्याप्रमाणेच प्रभाग विकास निधी व स्वेच्छा निधी मिळणार आहे. सदरचा निधी चालू आर्थिक वर्षासह सन 2026-27 या वर्षात वापरता येणार आहे. दरम्यान, स्थायी समितीकडून निधीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नवनिर्वाचित नगरसेवकांना याचा फायदा होणार आहे.
Lottery for newly elected corporators