महिला कर्मचार्‍यांना 180 दिवसांची प्रसूती रजा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची महत्त्वपूर्ण घोषणा

मुंबई :
मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचार्‍यांसाठी कम अर्ली-गो अर्ली सवलत देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मंगळवारी (दि. 10) विधान परिषदेत केली. दरम्यान, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत राज्यातील महिलांना योग्य सन्मान, संधी आणि सुरक्षितता देणारा समाज घडवण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने महिला शासकीय कर्मचार्‍यांसाठी 180 दिवसांची प्रसूती रजा मंजूर केली असून, प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास कमाल एक वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय अर्धवेतनी रजा घेण्यासही परवानगी देण्यात आल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने विधान परिषदेत प्रस्तावावर झालेल्या विशेष चर्चेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उत्तर दिले.

विविध योजना प्रभावीपणे सुरु

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकार विविध योजना प्रभावीपणे राबवत असल्याचे सांगताना सुनेत्रा अजित पवार यांनी ‘लाडकी बहीण’, ‘नमो महिला सक्षमीकरण’, ‘लेक लाडकी’, ‘अन्नपूर्णा’, ‘लखपती दीदी’ यांसारख्या योजनांचा उल्लेेख केला. बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद मॉल, उमेद मार्ट आणि महालक्ष्मी सरस यांसारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. बचत गटांची उत्पादने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली.

180 days maternity leave for female employees

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *