शहरातील पायाभूत सुविधांसह 12 विषयांवर महासभा गाजणार

18 ला नियमित महासभा

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेत लोकप्रतिनिधींची सत्ता आल्यानंतर नियमितपणे महासभा घेतली जात आहे. दरम्यान, येत्या 18 मार्च रोजी नियमित महासभा होणार आहे. ही सभा पायाभूत सुविधांसह बारा विषयांवर चांगलीच गाजण्याची शक्यता आहे. येत्या बुधवारी सकाळी 11.30 वाजता महापालिका मुख्यालयात ही महासभा होणार आहे.
यावेळी मागील तहकूब केलेल्या विषयांसह शहरविकास, पायाभूत सुविधा, निविदाप्रक्रिया, शैक्षणिक सुविधा आणि विविध प्रशासकीय निर्णय यावर चर्चा होणार आहे.
सर्वसाधारण सभेनंतर अंदाजपत्रकावर मार्च महिन्याच्या आत महासभा होणार आहे. ही सभा वेगळी असेल. स्थायी समितीने दुरुस्तीसह अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे. त्यानंतर हे अंदाजपत्रक महासभेत जाणार आहे. महासभेत त्यावर चर्चा होऊन त्याला मंजुरी दिली जाणार आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या अद्याप झालेल्या नाहीत. त्या केव्हा होणार यावर या सर्वसाधारण महासभेत घोषणा होऊ शकते किंवा त्यावर चर्चा होऊ शकते. मनपाच्या प्रशासकीय स्तरावरील काही नियुक्त्या आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांंतर्गत बेघर निवारा केंद्राच्या व्यवस्थापनासंबंधी प्रस्तावावरही महासभेत चर्चा होणार आहे. शहरातील विकासकामांना गती देणारे महत्त्वाचे निर्णय या महासभेत होण्याची शक्यता असल्याने महासभेकडे नगरसेवकांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
यावेळी सिंहस्थ कुंभमेळा 2027-28 अनुषंगाने आरक्षित व अधिग्रहित जागांचे
सर्वेक्षण, तसेच संबंधित कामांसाठी प्रशासकीय मंजुरी देण्याचा प्रस्ताव सभेपुढे ठेवण्यात येणार आहे. सर्वेक्षण कामांच्या दरनिश्चितीबाबतही निर्णय अपेक्षित आहे.
नाशिक पूर्व विभागातील श्रीदत्त मंदिर परिसरातील रस्त्याचे नामकरण करण्याचाही विषय महासभेपुढे येणार आहे. जिल्हा वार्षिक योजना व मूलभूत सोयी-सुविधा विकास कार्यक्रमांतर्गत प्रस्तावित कामांना मंजुरी, महापालिका शाळांच्या दुरुस्तीकामांसाठी निधी मंजुरी, पर्यटन विकास योजनेतील कामांना मान्यता देण्याबाबत निर्णय अपेक्षित आहे.

विरोधी पक्षनेता व सभागृह नेता निवड

दरम्यान, महापालिकेत अद्याप विरोधी पक्षनेता व सभागृह नेता निवड केलेली नाही. मात्र, बुधवारच्या महासभेत सभागृह नेता व विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

 

The general assembly will discuss 12 topics including city infrastructure.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *