केरळी महिला मंडळाचा ‘अथीरोलसवम तिरुवथिरा’ महोत्सव

सिडको : विशेष प्रतिनिधी
केरळमधील प्रसिद्ध ‘अथीरोलसवम तिरुवथिरा’ सणानिमित्त नाशिकमध्ये स्थायिक केरळी महिला मंडळाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात मोठ्या संख्येने केरळ समाजबांधव सहभागी झाले होते.
पाथर्डी फाटा येथील टोयोटा वासनमागील मुरलीधर गामणे मैदानावर कार्यक्रमास प्रारंभ झाला. तिरुवथिरा हा केरळमधील महत्त्वाचा सण असून, वैवाहिक सद्भावनेचे प्रतीक म्हणून तो साजरा केला जातो. या सणात प्रामुख्याने महिलांचा सहभाग असतो. विवाहित महिला पती व कुटुंबाच्या कल्याणासाठी, तर अविवाहित महिला आदर्श जीवनसाथी मिळावा, या हेतूने हे व्रत करतात.
यानिमित्ताने सुमारे 250 महिलांनी पारंपरिक वेशभूषेत गोलाकार फेर धरत तिरुवथिरा नृत्य सादर केले. पारंपरिक संगीताच्या तालावर सादर झालेल्या या लयदार नृत्याने उपस्थितांची मनं जिंकली.
महोत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून भाजप गटनेते श्याम बडोदे, नगरसेवक भगवान दोंदे, नगरसेविका माधुरी डेमसे, नगरसेविका वैशाली दळवी, बाळकृष्ण शिरसाट, अंकिता मुदलियार, संदीप दोंदे, मदन डेमसे, ज्योती गायकवाड, शरद फडोळ, अनिल गायकवाड, प्रदीप जगताप तसेच संत निवृत्तिनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष राहुल महाराज साळुंके आदी उपस्थित होते.
या महोत्सवाच्या माध्यमातून नाशिककरांना केरळची संस्कृती, मल्याळी महिलांचा लयबद्ध पदन्यास आणि संगीताचा सुरेल संगम अनुभवता आला. कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत अध्यक्षा बिंदू वासव यांनी केले. प्रास्ताविक संयोजक प्रमुख जया कुरुप यांनी केले, तर आभार जलजा सुगुनन यांनी मानले. सूत्रसंचालन मनोज पुनूर यांनी केले. कार्यक्रमासाठी समन्वयक विनीता पिल्लई, श्रीरेखा नायर, विजया नायर तसेच महोत्सव संयोजन समितीच्या सदस्यांनी
परिश्रम घेतले.

Kerala Mahila Mandal’s ‘Athirolasavam Thiruvathira’ festival

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *