सेन्सेक्स कोसळला; 12 लाख कोटींवर पाणी

मुंबई :
शेअर बाजारात गुरुवारी मोठी आपत्ती आली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक 3 टक्क्यांहून अधिक कोसळले आणि तीन दिवसांची तेजी एकाच दिवसात संपुष्टात आली. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली मोठी वाढ आणि जागतिक बाजारांमधील नकारात्मक वातावरण हे यामागील प्रमुख कारण ठरले. सेन्सेक्स जवळपास 2573.23 अंकांनी 74,130 वर व्यवहार करत आहे. निफ्टीदेखील 787.60 अंकांनी घसरून 22,990 च्या खाली आला आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 439 लाख कोटी रुपयांवरून गुरुवारी 427 लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले आहे. याचा अर्थ, केवळ एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 12 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

Sensex collapses; Rs 12 lakh crores lost

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *