नाशिक जिल्ह्यात चारचाकी वाहनांमध्ये 300 ने घट

दुचाकी वाहनांना यंदा सर्वाधिक पसंती

पंचवटी : सुनील बुनगे
हिंदू नववर्षाचा उत्साह आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत नाशिककरांनी वाहन खरेदीला मोठा प्रतिसाद दिला आहे. यावर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात एकूण 3,627 नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षाच्या तुलनेत वाहन खरेदीची संख्या वाढली असली, तरी सरकारी तिजोरीत जमा होणार्‍या महसुलात मात्र सुमारे 2.10 कोटींंची घट पाहायला मिळाली आहे. दरम्यान, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 513 अधिक वाढ झाली असून, चार चाकी वाहनांमध्ये 300 ने घट झाली आहे.
यंदा गुढीपाडव्याला नाशिककरांनी खरेदी केलेली वाहने अशी ः ट्रॅक्टर (06), बस (21), बांधकाम साहित्य वाहन (03), क्रेन वाहन (06), एक्सवेटर (13), मालवाहू वाहने (201),
हार्वेस्टर (01), मोटारसायकल/ स्कूटर (2,156), मोपेड (02), मोटार कॅब (54), कार (1,004), तीन चाकी रिक्षा मालवाहू (12), प्रवासी रिक्षा (148).
यंदा नाशिकच्या रस्त्यावर 2,156 नवीन दुचाकी आणि स्कूटर धावताना दिसणार आहेत. गेल्या वर्षी हा आकडा 1,643 होता. मध्यमवर्गीय आणि तरुणाईने दुचाकी खरेदीवर अधिक भर दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मात्र, कार खरेदीमध्ये यंदा थोडी नरमाई दिसली. गेल्या वर्षी 1,304 कारची नोंदणी झाली होती, तर यंदा हा आकडा 1,004 वर स्थिरावला आहे.
व्यावसायिक दृष्टिकोनातूनही हा मुहूर्त फायदेशीर ठरला आहे. यंदा 201 नवीन मालवाहू वाहने आणि 148 प्रवासी रिक्षांची नोंदणी झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी केवळ नऊ प्रवासी रिक्षांची नोंदणी झाली होती. त्या तुलनेत यंदा रिक्षा खरेदीत मोठी झेप घेतली आहे. शेती क्षेत्राशी संबंधित ट्रॅक्टर आणि
हार्वेस्टरच्या नोंदणीत यंदा मोठी घट पाहायला मिळाली आहे. गेल्या वर्षी 76 ट्रॅक्टरची नोंद झाली होती, तर यंदा केवळ सहा ट्रॅक्टरची नोंदणी झाली होती.

वाहनांची संख्या वाढली, उत्पन्न घटले

आरटीओ प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार :
2025 (गुढीपाडवा): 3,490 वाहने, महसूल : 21.27 कोटी.
2026 (गुढीपाडवा): 3,627 वाहने, महसूल : 19.16 कोटी.

Four-wheeler numbers decrease by 300 in Nashik district

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *