काळाराम मंदिराच्या प्रांगणात गुंजले गोदा आरतीचे सूर

पंचवटी : प्रतिनिधी

श्री काळाराम संस्थानतर्फे आयोजित वासंतिक नवरात्र महोत्सवात रविवारी रामतीर्थ सेवा समितीतर्फे गोदा आरती करण्यात आली. मंदिराच्या प्रांगणात प्रथमच गोदारतीचे जय देवी सूर सरिते गोदावरी माता हे सूर गुंजले. मंदिराच्या भोवताली आरतीसाठी तयारी करण्यात आली. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. आरतीच्या अगोदर श्रीरामअष्टक पठण करण्यात आले. आरतीसाठी नियमित गोदा आरती करणारे गोदासेवक आले होते. उपस्थित भाविक गोदा आरतीत सहभागी झाले. या कार्यक्रमास सहकार्य रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यांनी केले.

The sounds of Goda Aarti resonated in the courtyard of Kalaram Temple.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *