शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके

उपस्थितांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक

पंचवटी : प्रतिनिधी
लाठीकाठी, भाला, दांडपट्टा, तलवार, चक्र आदी शिवकालीन शस्त्र कशाप्रकारे हाताळली जात होती, त्यांच्या सहाय्याने शत्रूला कसे नेस्तनाबूत करण्यात येत होते, हे दाखविणार्‍या शिवकालीन युद्धकलेच्या थरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
राष्ट्रवीर संघाच्या पवन माळवे यांच्या विविध गटांतील विद्यार्थ्यांनी हे प्रात्यक्षिक सादर करताना त्यातील काही बालकांनी सादर केलेल्या युद्धकलांचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले.
श्री काळाराम संस्थानतर्फे वासंतिक नवरात्र महोत्सवात झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी विविध व्यायाम प्रकार करून दाखविण्यात आले. संगीताच्या तालावर सर्वांगसुंदर व्यायाम, सूर्यनमस्कार, भूमी नमस्कार, वृश्चिकदंड, पार्श्वदंड, चक्रीदंड, सिंहदंड, राममूर्तीदंड यांचे प्रात्यक्षिक विद्यार्थी व शिक्षकांनी केले.
लाठीकाठी, मन, मनगट, मस्तिष्क यांना बळ प्राप्त होते. कैचीफेक, भालाफेक, लाठीकाठी फिरवणे, विटा मारणे, तलवार फिरविणे, पट्टा चालविणे, चकवा फिरविणे, चक्र फिरवीत ते दुसर्‍याकडे फेकताच दुसर्‍याने ते त्याच गतीने फेकणे, उडी घेत दांडपट्ट्याने बटाटे कापणे, हातातील नारळ फोडणे, शरीरावर विविध ठिकाणी काकडी ठेवून ती तलवारीने कापणे असे थरारक प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आले. आनंद ठाकूर यांनीही काही प्रात्यक्षिके करून दाखविले. प्रारंभी विश्वस्त शुभम मंत्री, अ‍ॅड. अक्षय कलंत्री, अमित कोठावदे यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले.

Thrilling demonstrations of Shiva-era martial arts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *