भोंदू कॅप्टनविरुद्ध सहा गुन्हे

’एसआयटी’कडून तपास वेगात

नाशिक : प्रतिनिधी
येथील भोंदूबाबा अशोककुमार एकनाथ खरात ऊर्फ ‘कॅप्टन बाबा’ याच्याविरुद्ध आतापर्यंत सहा फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या प्रकरणात अधिक माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. संबंधित गुन्ह्यांबाबत कोणाकडेही ठोस माहिती असल्यास ती त्वरित एसआयटी पथकाशी संपर्क साधून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आरोपीने कोणत्याही व्यक्तीवर अन्याय, अथवा गुन्हा केल्याची माहिती असल्यास संबंधितांनी पुढे येऊन संपर्क साधावा. माहिती
देणार्‍याची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या तपासासाठी पोलीस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी, महिला पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे आणि पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एसआयटी पथकाच्या 9503270224 व 7775816389 या मोबाइल क्रमांकावर नागरिकांना थेट संपर्क साधता येणार आहे.

Six crimes against the fake captain

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *