साप्ताहिक राशिभविष्य

दि. 29 मार्च ते 4 एप्रिल 2026
पुरुषोत्तम नाईक

मेष : आर्थिक लाभ
या सप्ताहात बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. शनिची साडेसाती आहे. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च मोठ्या प्रमाणात वाढतील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांना आर्थिक लाभ होतील. अडकलेले पैसे वसूल होतील. आरोग्याची काळजी घ्या. कुपथ्य टाळा.
वृषभ : खर्च वाढतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शनि, अनुकुल आहेत. शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. चैनीच्या गोष्टींवर पैसे खर्च होतील. नोकरदारांचे कामात मन लागणार नाही. व्यापारी, व्यावसायिकांनी कोणावर विसंबून निर्णय घेऊ नये. प्रकृती चांगली राहील.
मिथुन : लाभ होतील
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. शेअरमध्ये लाभ होतील. नोकरदारांनी वादविवाद, संघर्ष टाळावे. व्यापारी, व्यावसायिकांच्या अडचणी दूर होतील. प्रकृती जपा.
कर्क : प्रगती होईल
या सप्ताहात रवी, मंगळ, शुक्र, शनि अनुकूल आहेत. बुध, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च वाढतील. नोकरदारांची प्रगती होईल. व्यापारी, व्यावसायिकांचे निर्णय चुकतील. शेअरमध्ये लाभ होतील. शासकीय कामात सतर्क रहा. प्रकृती सांभाळा.
सिंह : भाग्योदय होईल
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. रवी, मंगळ, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. अडकलेले पैसे वसूल होतील. खर्च नियंत्रणात राहतील. भाग्योदयकारक घटना घडतील. नोकरदारांना बढती मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांनी निर्णय घेण्यात घाई करू नये. प्रवास टाळा. वाहन जपून चालवा. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या : वाद टाळा
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांनी कामावर लक्ष ठेवावे. व्यापारी व्यावसायिकांनी निर्णय सावधपणे घ्यावे. शासकीय, कोर्ट, कचेरीची कामे विलंबाने होतील. आरोग्य जपा, वाद टाळा.
तूळ : समिकरणे जुळतील
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, मंगळ, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांची धावपळ होईल. व्यापारी, व्यावसायिवकांची समिकरणे जुळतील. मन प्रसन्न राहील. शेअरमध्ये लाभ होतील. प्रकृती चांगली राहील.
वृश्चिक : मंगलवार्ता कळतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शनि अनुकूल आहेत. गुरू, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांचे निर्णय चुकतील. कोर्ट कचेरीची कामे अडचणीत येतील. मंगलवार्तांनी मन प्रसन्न होईल. आरोग्याकहे दुर्लक्ष करू नका.
धनु : विवाह जुळतील
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, मंगळ, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत.या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. सुखवार्ता कळतील. नोकरदारांना अडचणी त्रस्त करतील. व्यापारी, व्यावसायिकांची वाटचाल सुरू राहील. अविवाहितांचे विवाह जमतील. मनाप्रमाणे वधू-वर मिळतील. आरोग्य चांगले राहील.
मकर : सन्मानप्राप्ती होईल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना बढती मिळण्याचे योग संभवतात. व्यापारी, व्यावसायिकांना आर्थिक लाभ होतील. कर्तृत्व झळाळून निघेल. सन्मानप्राप्ती होईल. प्रकृतीची काळजी घ्या.
कुंभ : अचानक धनलाभ
या सप्ताहात रवी, मंगळ, गुरू, शुक्र, बुध, अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, राह, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. अचानक धनलाभाचे योग संभवतात. नोकरदारांना पगारवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विवाह जमतील. व्यापारी, व्यावसायिकांनी सावध रहावे. आरोग्य जपा.
मीन : आर्थिक समस्या
या सप्ताहात मंगळ, शनि अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, बुध, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्र्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक समस्या भेडसावतील. खर्च वाढतील. शासकीय, कोर्ट कचेरीची कामे अडचणीत येतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांचे निर्णय चुकतील. मनावर संयम ठेवा. वादविवाद टाळा. आरोग्य चांगले राहील.

Weekly Horoscope

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *