जैन स्थानक निवडणुकीत जय जिनेंद्र पॅनल विजयी

नाशिक : प्रतिनिधी
येथील जैन श्वेतांबर स्थानकवासी श्री संघ, रविवार कारंजा या जैन समाजाच्या देशभर नांवलौकिक असलेल्या संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक केव्हीएन नाईक शिक्षण संस्था, गंगापूर रोड येथे मोठ्या चुरशीच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीत जय जिनेंद्र पॅनल विजयी झाला. 33 विश्वस्तांसाठी असलेल्या या निवडणुकीत नामको बँकेचे संचालक व नामको चैरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी व पारसमल साखला यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीत त्यांचे फक्त 30 उमेदवारांचेच जय महावीर पॅनल तर ज्येष्ठ श्रावक मंगलचंद साखला यांचे नेतृत्वातील पूर्ण 33 उमेदवारांचे जय जिनेन्द्र पॅनल व काही तांत्रिक अडचणीमुळे माघारी घेऊ न शकलेले 5 अपक्ष उमेदवार अशा एकूण 68 उमेदवारांनी आपले नशीब अजमावले. या निवडणुकीत जय जिनेन्द्र पॅनलचे 25 तर जय महावीर पॅनलचे 8 उमेदवार विजयी झाले.3559 मतदार असलेल्या निवडणुकीत 2660 म्हणजेच 75 टक्के मतदान झाले. 141 मतपत्रिका बाद झाल्या. 2519 मते वैध ठरली.
जय जिनेन्द्र पॅनलचे विजयी उमेदवार :
प्रवीण संचेती 1528, जव्हेरीलाल (जेसी) भंडारी 1492 , विनोद ( बिट्टू) बेदमुथा 1486, ललित मोदी 1444 , रवींद्र चोपडा 1403 , मंगलचंद साखला 1378 , मोहनलाल लोढा 1368 , शंकरलाल गांग 1359 , चंद्रकांत पारख 1359 , आर्कि. हेमंत दुगड 1353, धन्नालाल बंब 1351, नटवरलाल बोरा 1347, ऍड अजित छल्लाणी 1343 , अभय ब्रह्मेचा 1340 , गौतम हिरण 1338, अजय पारख 1305, कल्पना बुरड 1303, चंद्रशेखर (गोटू) चोरडिया 1302, मोहनलाल ब्रम्हेचा 1297 , विजय बेदमुथा 1292, आनंद साखला 1257, विजय ओस्तवाल 1253 , चंचल धाडीवाल 1248, बालचंद चोरडिया 1243,संदीप कटारिया 1236 तर जय महावीर पॅनलचे पारसमल साखला 1456, पंकज सामसुका 1336, विनोद कांकरिया 1309,मंगला घिया 1284 , सागर भटेवरा 1282 , नीलेश भंडारी 1271, हरीश खटोड 1261 ,चेतन राका 1256 अशी मते मिळाली.
सामोपचाराने व समन्वयाने काम करणार्‍या कार्यकर्त्यांना संधी दिली जावी अशी भूमिका मांडून समाजधुरीणांनी निवडणूक टाळण्याचा बराच प्रयत्न केला परंतु यश न आल्याने व चुरशीची निवडणूक झाल्याने जैन समाजाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. निवडणूक अधिकारी म्हणून ऍड.अनिल बाफना व ऍड अभय बोरा यांनी जबाबदारी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *