नाशिक : प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या निवडणुकीची अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध केली आहे. त्यापाठोपाठ आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सोमवारी (दि.23) जाहीर केला. त्यानुसार आरक्षण सोडत 31 मे रोजी जाहीर होणार आहे. दरम्यान त्याआधी 27 मेस यासंदर्भातील नोटीस प्रसिद्ध करण्यात येईल. आरक्षण काढल्यानंतर दुसर्या दिवशी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. हरकती सुनावणीनंतर अंतिम आरक्षण सोडत 13 जूनला होणार आहे. दरम्यान आरक्षण सोडत ऑनलाइन पध्दतीने होणार की, कालिदास कलामंदीर हे अद्याप स्पष्ट होउ शकलेले नाही.
मंगळ्वारी प्रसिध्द होणार्या आरक्षण सोडतीकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा लागल्या आहेत. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ओबीसी आरक्षणाशिवाय आरक्षण सोडत जाहीर होणार असल्याचे कशा पध्दतीने आरक्षण पडेल. याची जोरदारच चर्चा राजकीय सुरु आहे. ओबीसी घटकांशिवाय आरक्षण पडत असल्याने 104 जागा खुल्या प्रवर्गातून तर 19 अनुसूचित जाती व 9 अनुसूचित जमाती या प्रमाणे आरक्षण पडणार आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेद्वारांना खुल्या गटातून उमेद्वारी करावी लागणार आहे. दरम्यान 31 मे रोजी थेट प्रभाग निहाय आरक्षण पडणार असल्याने राजकीय पदाधिकार्यांची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. आरक्षण सोडतीनंतर 1 ते 6 जूनपर्यंत त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहेत. त्यानंतर आक्षेप आणि हरकतींवर विचार करुन अंतिम आरक्षण सोडत 13 जूनला अंतिम होऊन प्रसिद्ध केली जाइल. आरक्षण अंतिम झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेसाठी साधारणचा दीड महिन्याचा कालावधी लागेल. त्यामुळे महापालिकांंमध्ये सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीस निवडणूका होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील ओबीसी राजकीय आरक्षणावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 12 जूनला होणार आहे. तोपर्यंत राज्य सरकार ट्रिपल टेस्ट आणि इम्पिरिकल डाटा तयार करुन सादर करणार का हे पाहावे लागणार आहे. महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षणासाठी बांठिया आयोगाची नियुक्ती केली आहे. राज्य मंत्रीमंडळाचा ठराव सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत राज्य निवडणूक आयोगाला तात्काळ महापालिका निवडनुकीची प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने यापूर्वी 17 मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहिर केली होती. यात सात प्रभागांमध्ये काहीसे बदल करत इतर सर्व प्रभागांची रचना जैसे थे ठेवली होती. प्रभागाची रचना झाल्यानंतर सोमवारी आरक्षण जाहिर करण्यात आले. आता 31 मे रोजी महापालिकेतील आरक्षण सोडत टाकली जाणार आहे.