नाशिकमधील कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणी सखोल तपास : मुख्यमंत्री

बीड :
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये धक्कादायक वाढ झाली असून, आता एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपनीतील संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीतील वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी महिला कर्मचार्‍यांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले असून, याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.
नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याने भविष्य सांगण्याच्या बहाण्याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले होते. त्यानंतर रवींद्र एरंडे याने महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून त्यांना धमकावल्याची घटना ताजी असतानाच, आता कॉर्पोरेट क्षेत्रातील हे तिसरे मोठे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी दखल घेतली असून, या घटनेचा सखोल तपास करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमधील मल्टिनॅशनल कंपनीत घडलेल्या प्रकाराबाबत म्हणाले की, नाशिकमध्ये पोलिसांनी उघडकीस आणलेलेआयटी कंपनीतील प्रकरण अतिशय गंभीर आहे, एखाद्या टेक्निकल कंपनीमधे अशाप्रकारे गोष्टी घडणे धक्कादायक आहे. त्यामुळे या सगळ्याचा सखोल तपास केला जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
नाशिकमधील एका नामांकित मल्टीनॅशनल आयटी कंपनीत काम करणार्‍या महिला कर्मचार्‍यांनी त्यांच्या वरिष्ठांविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. आरोपींनी नोकरीचे आमिष दाखवून आणि नंतर ‘माझ्यामुळेच तुला नोकरी मिळाली’ असे उपकाराचे ओझे टाकून महिलांना जाळ्यात ओढले. पीडितेच्या तक्रारीनुसार, सुट्टीच्या दिवशी तिला एका रिसॉर्टवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तर एक गुन्हा धर्म परिवर्तनाच्या प्रयत्नाचा आहे.
सदर कंपनीत कार्यरत महिला कर्मचार्‍यांचा पुरुष कर्मचार्‍यांकडून विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून 6 संशयितांना अटक करण्यात आली आहे. तक्रारदारांमध्ये आठ महिला तर एका युवकाचा समावेश आहे. या युवकाच्या धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचेही समोर आले. त्यामुळे या गुन्ह्यांची व्याप्ती, गांभीर्य व संवेदनशीलता लक्षात घेऊन सखोल तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सहायक आयुक्त (गुन्हे) यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक अर्थात ‘एसआयटी’ची स्थापना केली आहे.

Thorough investigation into sexual exploitation case in a company in Nashik: Chief Minister

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *