भोंदू खरातवर गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याचे कलम लावावे

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

नाशिक : प्रतिनिधी
भोंदू खरात प्रकरणाची तिसर्‍या गुन्ह्याची सुनावणी झाली. त्यावेळी सरकारी वकिलांनी असे सांगितले की, या भोंदूने एका महिलेला अपत्यप्राप्तीचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले होते. तिला होणारे अपत्य हे मुलगाच होईल, असा दावा त्याने केला आहे. त्यासाठी दैवी व अघोरी उपचार त्याने केले होते. खरे तर त्याचा असा दावा हा बेकायदेशीर व अवैद्यानिक आहे. गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र 1994 (गर्भलिंग निदान प्रतिबंध) या कायद्याचे उल्लंघन करणारे हे कृत्य आहे. या गुन्ह्यात त्याच्यावर जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम अगोदरच लागले गेले आहे. म्हणून भोंदू खरातच्या विधानाची खातरजमा करून, सबळ पुरावे मिळवून, त्याच्याविरोधात गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याचे कलम लावावे, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने एस.आय. टी. प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे ‘अंनिस’चे राज्य प्रधान सचिव डॉ. टी.आर. गोराणे व राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे, जिल्हा विधी सचिव अ‍ॅड. सुशीलकुमार इंदवे यांनी केली आहे.

Section of the Prevention of Fetal Sex Detection Act should be imposed on fake Kharats

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *