चर्चेपूर्वीच अटी-शर्थींचा पेच
सर्वांत मोठा पेच इराणच्या शिष्टमंडळाबाबत निर्माण झाला आहे. ताज्या माहितीनुसार, इराणचे प्रतिनिधी अद्याप इस्लामाबादमध्ये पोहोचलेले नाहीत. लेबनॉनवर इस्रायलकडून होत असलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे इराण प्रचंड संतापलेला आहे. दुसरीकडे, पाकिस्तान सरकार इराणी नेत्यांच्या सुरक्षेबाबत कमालीचे सावध असून, या बैठकीदरम्यान इस्रायलकडून काही अघोषित कारवाई होऊ शकते का, या भीतीने इस्लामाबादमध्ये तणावाचे वातावरण आहे.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
♦ इराणचे शिष्टमंडळ : अद्याप पाकिस्तानात दाखल नाही. सुरक्षेची चिंता.
♦ अमेरिकेची भूमिका : ट्रम्प यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार चर्चेची तयारी, पण सावध पवित्रा.
♦ लेबनॉनची अट : चर्चेपूर्वी तत्काळ युद्धविराम अनिवार्य.
♦ इस्रायलचा पवित्रा : लेबनॉनमधील लष्करी कारवाया सुरूच ठेवण्याचे संकेत.
Shadow of uncertainty over ‘Islamabad peace talks’!