निफाड : तालुका प्रतिनिधी
यंदा एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकू लागल्याने शेती मशागतीची कामे ठप्प होऊ लागली. घामाच्या धारांनी जीव कासावीस होत आहे. सोमवारी, 13 एप्रिलला तालुक्यातील कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रावर 40.2 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मे महिन्यात तापमानाचा पार 55 अंशांपार जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
जिल्ह्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा निफाड तालुका यंदा वाढत्या उष्णतेच्या झळांनी होरपळू लागला आहे. उन्हाच्या झळांनी सर्वसामान्य नागरिक बेजार झाला आहे. गरम पेयाची जागा शीतपेयांनी घेतली आहे. शरीराला गारवा मिळावा यासाठी दही, ताक, लस्सी, लिंबू सरबत यांसह फळांना मागणी वाढली आहे. दरम्यान , विवाह मुहूर्ताच्या दाट तिथी 25 एप्रिल ते 13 मे दरम्यान आहेत. याच कालावधीत उष्णतेची तीव्रता वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने वर्हाडींसह नातेवाईक व वधू-वर पक्षांची तारांबळ उडणार आहे. वाढत्या उष्णतेमुळे मजूरवर्ग शेतात जाण्याचे टाळू लागल्याने शेती मशागतीची कामे ठप्प झाली आहेत.
Niphad’s mercury at 40.2 degrees