अपघातात चालक, क्लीनर गंभीर जखमी
देवळा : प्रतिनिधी
नाशिक-गुजरात महामार्गावर देवळा शहरात सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कंटेनरचा भीषण अपघात झाला. त्यात चालक व क्लीनर गंभीर जखमी झाले. नाशिककडून गुजरातच्या दिशेने जाणारा कंटेनर (जीजे 12- बीएक्स 8767) ब्रेक फेल झाल्याने देवळा येथील कोलथी नदीच्या पुलावर पलटी झाला. हा अपघात ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनर पुलाचा कठडा तोडत पलटी झाला. या अपघातामुळे आजूबाजूच्या व्यावसायिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी मदतकार्य व पोलीस प्रशासनाच्या मदतीने दोन जेसीबीच्या सहाय्याने कंटेनर सरळ केला. सदर कंटेनरमध्ये हेवी पद्धतीचे लोखंड स्वरूपात मटेरियल भरलेले होते. हा अपघात जर काही वेळानंतर झाला असता, तर मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले असते. या अपघातात कंटेनरचा चालक व क्लीनर गंभीर जखमी झाले. त्यांना देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस प्रशासन व स्थानिक नागरिकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत दोन जेसीबीच्या सहाय्याने कंटनेर बाजूला केला. प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन पूल व रस्ता सुस्थितीत करावा, अशी मागणी नागरिक व प्रवासी करीत आहेत.
Container overturns due to brake failure in temple