वावी परिसराचा दुष्काळ हटणार

कोकाटेंच्या पुढाकाराने 1500 हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली

सिन्नर : प्रतिनिधी
भौगोलिक विषमतेमुळे कायम अवर्षणप्रवण म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील वावी परिसराचा दुष्काळ हटषवण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी पुढाकार घेतला आहे.
कुंदेवाडी- सायाळे पूरचारीवरून वावी परिसरासाठी निर्‍हाळे येथील बुवाजी बाबा मंदिराजवळील आउटलेट वरून वितरिका टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेमुळे वावी शिवारातील सुमारे 1500 ते 1600 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. परिसरातील शेतीला मोठा आधार मिळणार आहे.
निर्‍हाळे येथील बुवाजी बाबा मंदिराजवळील देवनदीच्या बंदिस्त पूरचारीच्या आऊटलेटमधून वावीपर्यंत पाणी आणले जाणार आहे. सुमारे तीन किलोमीटर लांबीची व दोन फूट परीघाची जलवाहिनी टाकण्यात येणार असून ती फुलेनगर-वावीदरम्यान असलेल्या म्हसोबाच्या माथ्यापर्यंत पोहोचेल. तेथून नैसर्गिक उतारामुळे पाणी दोन दिशांनी शिवारात पसरेल. बुवाजी बाबा परिसरातील आउटलेट उंचावर असल्यामुळे कुठल्याही उपसा सिंचन योजनेशिवाय गुरुत्वाकर्षणाने हे पाणी वावी परिसरात फिरणार आहे. या कामाच्या शुभारंभाप्रसंगी सेवानिवृत्त अभियंता अविनाश लोखंडे, महंत बबन महाराज सांगळे, वावीचे सरपंच विजय काटे, प्रशांत करपे, संदीप राजे भोसले, कन्हैयालाल भुतडा, विजय सोमानी, कैलास जाजू, संतोष जोशी, बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल राजेभोसले, गणेश वेलजाळी यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Drought in the Vavi area will end

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *