नाशिक : प्रतिनिधी
एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात नाशिकमध्ये उष्णतेची तीव्रता वाढत असून, बुधवारी (दि. 22 एप्रिल) शहराचा कमाल तापमानाचा पारा 39.4 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. किमान तापमान 22.0 अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, दिवस-रात्र तापमानातील फरक लक्षणीय राहिला.
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, सकाळी सापेक्ष आर्द्रता 55 टक्के होती; मात्र दुपारनंतर ती झपाट्याने घटत सायंकाळपर्यंत केवळ 27 टक्क्यांवर आली. आर्द्रतेतील या घटेमुळे वातावरण कोरडे झाले असून, दुपारच्या वेळेत उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे.
दरम्यान, शहरात कोरडे आणि उष्ण वातावरण कायम राहिले. सूर्यकिरणांची तीव्रता 40.8 मिमी इतकी नोंदली गेली असून, त्यामुळे उष्णतेचा परिणाम अधिक
जाणवत आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवस तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता असली तरी उष्णतेचा प्रभाव कायम राहू शकतो. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, हलके व सैल कपडे परिधान करणे आणि उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे
गरजेचे आहे.
The heat of the sun has increased; mercury at 39.4 degrees, humidity has decreased