नाशिकचा पारा 42 अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट कायम

नाशिक : प्रतिनिधी
शहरासह जिल्ह्यात रविवारी (दि. 10) उष्णतेची तीव्रता आणखी वाढली असून, कमाल तापमान थेट 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. हवामान विभागाच्या नोंदीनुसार दिवसभर कोरडे व उष्ण वातावरण राहिल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. मौसम निरीक्षण केंद्राच्या माहितीनुसार, 11 मे रोजी नाशिकमध्ये किमान तापमान 26 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले, तर कमाल तापमान 42 अंशांवर गेले. हवेतील आर्द्रता केवळ 23 टक्के असल्याने उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत होती. दिवसभर कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी दिसली. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय दुपारी बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उष्माघातापासून बचावासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Nashik’s mercury at 42 degrees; Intense heat wave continues

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *