नगरसूल : येवला तालुक्यातील नायगव्हाण येथील लहानू दत्तू सदगीर यांनी जनावरांसाठी सुमारे 35-40 ट्रेलर चारा विकत आणून त्याची कुट्टी करून शेतात ठेवला होता. घरी कोणी नसताना अचानक दुपारी आग लागल्याने संपूर्ण चारा जळून खाक झाला. त्याचप्रमाणे 20 पाइप, तसेच 20 ट्रेलर शेणखत, जनावरांचे शेड खाक झाले. तसेच शेडमधील बैल आगीने होरपळा.
आजूबाजूच्या ग्रामस्थांनी पाण्याच्या टँकरच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग इतकी भयानक होती की विझविणे शक्य नसल्याने सरपंच सुनील साळवे यांनी अग्निशमन दलाला दूरध्वनीद्वारे बोलावले. नंतर ही आग आटोक्यात आली.
मी दूध व्यवसाय करीत असल्याने जनावरांसाठी परिसरातील गावांमधून विकत चारा घेऊन त्याची कुट्टी करून साठवून ठेवला होता. परंतु सर्व चारा जळून खाक झाला. शासनाने जनावरांसाठी काहीतरी आर्थिक मदत व चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे.
– लहानू दत्तू सदगीर, दुग्ध व्यावसायिक, नायगव्हाण35 tractors of fodder destroyed in Naigavhan fire