सिडको : प्रतिनिधी
म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेठ रोड परिसरात बंद फ्लॅट फोडून अज्ञातांनी 11 लाख 15 हजारांंचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण बाळू चारोस्कर (वय 36, रा. मैत्रप्रतीक अपार्टमेंट, सप्तरंग बिल्डिंगमागे, पेठ रोड, नाशिक) हे कुटुंबासह कामानिमित्त मूळ गावी पेठ येथे गेले होते. याच संधीचा चोरट्यांनी फायदा घेऊन त्यांच्या राहत्या घराचे, तसेच शेजारी राहणार्या नागरिकांच्या घराचे कुलूप व कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील सोन्याच्या माळा, पोत, नेकलेस, कानातील दागिने, अंगठ्या, नथ, लहान मुलांचे दागिने तसेच चांदीचे विविध दागिने असा एकूण 11 लाख 15 हजारांंचा ऐवज चोरी करून नेला.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सुमारे 500 ग्रॅम चांदीच्या दागिन्यांचाही समावेश आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक मद्रुपकर तपास करीत आहेत.
Action must be taken against the culprits in the MHADA case: Mayor