डोक्यात कुर्‍हाड टाकून मेहुण्याची निर्घृण हत्या

देवळा : प्रतिनिधी
बहिणीला नांदवत नाही व तिच्या आजारपणासाठी दवाखाना करत नाही, या कारणावरून शालकाने सरस्वतीवाडी (ता. देवळा) येथील मेहुण्यास ठार केल्याची घटना रविवारी
(दि. 10) खालप (ता.देवळा) येथे रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. संशयित आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वतीवाडी येथील प्रकाश रूपेश गांगुर्डे (वय 31) हा आपल्या बहिणीला नांदवत नाही व तिच्या आजारपणासाठी दवाखाना करत नाही, या कारणावरून त्याचा शालक समाधान भावसा पवार (रा. खालप, ता. देवळा) याने रात्री आठ वाजेच्या सुमारास खालप-मेशी रस्त्यावरील सिमेंटच्या पुलावर प्रकाश रूपेश गांगुर्डे मोबाइलवर बोलत असताना पाठीमागून कुर्‍हाडीने डोक्यावर वार केला. डोक्यात वर्मी घाव बसल्याने प्रकाश गांगुर्डेचा जागेवरच मृत्यू झाला. संशयित आरोपी समाधान पवार गुन्हा घडल्यापासून फरार आहे. त्याच्या तपासासाठी देवळा पोलिस व स्थानिक गुन्हेशाखेचे पथक रवाना झाले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, पोलिस उपनिरीक्षक विनय देवरे करत आहेत.

Brutal murder of brother-in-law by throwing an axe at his head

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *