पेट्रोल – डिझेलचा भडका

वैश्विक ऊजार्र्र्र्र् दरवाढीचा ग्राहकांना फटका; किमतीत 3 रु. वाढ

मुंबई : प्रतिनिधी
जागतिक बाजारात ऊर्जेच्या आणि कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या प्रचंड वाढीचा थेट बोजा आता पेट्रोलियम कंपन्यांनी ग्राहकांच्या पदरात टाकण्यास सुरुवात केली आहे. दीर्घकाळाच्या खंडानंतर देशातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार पेट्रोल प्रतिलिटर 3 रुपयांनी तर डिझेल प्रतिलिटर 3.11 रुपयांनी महागले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक अनिश्चितता आणि तेल कंपन्यांवर वाढणारा तोट्याचा ताण यामुळे हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे देशभरात मालवाहतूक महागण्याची आणि पर्यायाने सर्वसामान्य बाजारात महागाईचा मोठा भडका उडण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे.

परिणाम काय?

मालवाहतूक खर्च वाढण्याची शक्यता
जीवनावश्यक वस्तू महागण्याची भीती
सर्वसामान्यांच्या मासिक बजेटवर अतिरिक्त भार
कृषी आणि वाहतूक क्षेत्रावर परिणाम

कारणे

जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
आंतरराष्ट्रीय आर्थिक अनिश्चितता
तेल कंपन्यांवरील वाढता तोटा
आयात खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता

रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर
जागतिक आर्थिक घडामोडींमुळे भारतीय रुपयाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 96 रुपयांची ऐतिहासिक नीचांकी पातळी ओलांडली आहे. चालू आठवड्यातच रुपयामध्ये 80 पैशांपेक्षा जास्त मोठी घसरण
झाली आहे.

Petrol-diesel flare-up

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *