सीआरपीएफमध्ये 9,175 जागांवर मेगाभरती

नाशिक : विशेष प्रतिनिधी
केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) सरकारी नोकरी मिळवू इच्छिणार्‍या देशभरातील तरुणांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सीआरपीएफ अंतर्गत कॉन्स्टेबल (टेक्निकल, ट्रेड्समन आणि पायोनियर) पदांच्या एकूण 9,175 रिक्त जागा भरण्यासाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 20 एप्रिल 2026 पासून सुरू झाली आहे.
आता अर्ज करण्याची अंतिम मुदत अतिशय जवळ आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 19 मे 2026 पर्यंत आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करता येतील. अंतिम तारखेला सर्व्हरवर येणारा ताण किंवा तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या मेगाभरतीअंतर्गत जाहीर झालेल्या एकूण जागांपैकी पुरुष उमेदवारांसाठी 9,096 पदे आणि महिला उमेदवारांसाठी 79 पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. यामध्ये सर्वाधिक पदे ड्रायव्हर (चालक), मोची, सुतार, शिंपी, माळी, पेंटर, कूक आणि धोबी यांसारख्या विविध ट्रेड्ससाठी आहेत. या पदांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण (मॅट्रिक्युलेशन) असणे आवश्यक आहे. ड्रायव्हर पदासाठी अवजड वाहन चालवण्याचा परवाना आणि तांत्रिक पदांसाठी संबंधित क्षेत्रातील आयटीआय प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पे-लेव्हल 3 नुसार 21,700 रुपये ते 69,100 रुपये प्रतिमहिना वेतनश्रेणीसह इतर सरकारी भत्ते दिले जातील. या भरती प्रक्रियेसाठी वयोमर्यादा पदांनुसार निश्चित करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदासाठी उमेदवाराचे वय 21 ते 27 वर्षे दरम्यान असावे, तर इतर ट्रेड्समन आणि पायोनियर पदांसाठी 18 ते 23 वर्षे वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे. वयाची गणना 1 जानेवारी 2026 या तारखेच्या आधारावर केली जाईल. नियमांनुसार, अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, तर इतर मागासवर्गीय (ओबीसी) उमेदवारांना 3 वर्षे वयोमर्यादेत शिथिलता दिली जाईल. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे, तर एससी, एसटी आणि सर्व महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.

100 गुणांची संगणकीकृत परीक्षा

योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी सीआरपीएफतर्फे बहुस्तरीय निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये उमेदवारांना सर्वप्रथम 100 गुणांच्या संगणकीकृत लेखी परीक्षेला (सीबीटी) सामोरे जावे लागेल. या परीक्षेत गुणवत्तेच्या आधारावर पात्र ठरणार्‍या उमेदवारांची शारीरिक पात्रता चाचणी (पीईटी/पीएसटी), ट्रेड टेस्ट (कौशल्य चाचणी), मूळ कागदपत्रांची पडताळणी आणि शेवटी वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. सर्व निकष यशस्वीपणे पूर्ण करणार्‍या उमेदवारांची अंतिम नियुक्ती केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत अर्ज प्रक्रियेसाठी सीआरपीएफच्या ॠीशलीं.लीषि.र्सेीं.ळपॠ या वेबसाइटला भेट द्यावी.

 

Mega recruitment for 9,175 posts in CRPF

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *