अधिक मासामुळे चांदीच्या मागणीत वाढ

सुवर्ण बाजारात ग्राहकांची दिवसभर गर्दी

नाशिक : प्रतिनिधी
अधिक मासामुळे लेक-जावयाला वाण देण्यासाठी सध्या चांदीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. गुरुपुष्यामृत मुहूर्त, त्यास लाभलेला दिवसभराचा शुभ योग आणि अक्षय खरेदीची परंपरा, अशा त्रिवेणी पर्वणीचा लाभ घेत नाशिककरांनी सुवर्ण व चांदी खरेदीला पसंती दिली होती. विशेषतः जावई आणि लेकीसाठी वाणात दिल्या जाणार्‍या दागिन्यांसह चांदीच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचे पाहायला मिळाले.
अधिक मासातील गुरुपुष्यामृत मुहूर्त अक्षय कार्यासाठी शुभ मानला जातो. यादिवशी केलेल्या कार्याचे फळ अक्षय टिकते, अशी श्रद्धा असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सुवर्ण बाजाराकडे धाव घेतली. सोन्या-चांदीच्या वाढत्या किमती असूनही खरेदीत कोणतीही कमतरता दिसाली नाही. उलट पारंपरिक वाणासाठी लागणार्‍या वस्तूंना ग्राहकांनी प्राधान्य दिले.
महिलांनी अधिक मासात लागणार्‍या नथ, पायातील जोडवे, सोन्याच्या अंगठ्या यांची खरेदी केली. विशेष म्हणजे, अनेकांनी जुने चांदीचे जोडवे देऊन त्यात भर घालत नवीन जोडवे खरेदी करण्यास पसंती दिली. जावयासाठी चांदीचे ताम्हण, ताट तसेच दिवे खरेदी करण्यावर भर दिसला.
बाजारात ग्राहकांच्या सोयीसाठी कमी वजनाच्या व परवडणार्‍या वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सोन्याच्या अंगठ्या आणि इतर दागिन्यांची नेहमीप्रमाणेच खरेदी झाली. जुन्या वस्तू बदलून नव्या वस्तू घेण्याचे प्रमाण यंदा अधिक दिसून
आले.

जागतिक परिस्थितीच्या पाश्वर्र्भूमीवर सोन्या-चांदीच्या किमती वाढल्या असल्या, तरी गुरुपुष्यामृत मुहूर्तावरील खरेदीची परंपरा कायम आहे. खरेदीच्या पद्धतीत बदल झाला असून, ग्राहक जुन्या वस्तू देऊन नवीन वस्तू खरेदी करण्यास पसंती देत आहेत. महिलांनी जुने चांदीचे जोडवे बदलून नवीन खरेदी केले. जावयांना वाणात दिल्या जाणार्‍या वस्तू आणि सोन्याच्या अंगठ्यांची मागणीही चांगली होती. सुवर्ण बाजारात खरेदीचा चांगला माहोल दिसून आला. – मयूर शहाणे, संचालक, मयूर अलंकार

Increased demand for silver due to more fish

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *