बियाणे, खते, औषधांच्या किमतीत लक्षणीय वाढ

खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी संकटात

खमताणे : प्रतिनिधी
राज्यात यंदा पावसाची अनिश्चितता, वाढती महागाई आणि मागील हंगामातील आर्थिक फटका यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याने शेतीसाहित्य खरेदीवर दुष्काळाचे सावट असल्याचे चित्र बाजारात दिसत आहे.
मागील काही महिन्यांत कांदा, सोयाबीन आणि कापूस यांच्या प्रमुख पिकांना अपेक्षित दर न मिळाल्याने ग्रामीण भागातील आर्थिक गणित पूर्ण कोलमडले आहे. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने आधीच उत्पादनात घट झाली होती. त्यातही पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आला आहे. यातच बाजारात बियाणे व खतांचे दर वाढले आहेत. त्यातच काही भागांत व्यापार्‍यांकडून रोख रकमेची मागणी होत असल्याने कर्जबाजारी शेतकर्‍यांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
शासनाने तातडीने बियाणे व खतांवर अनुदान द्यावे पीककर्ज वितरण प्रक्रिया सुलभ करावी आणि दुष्काळग्रस्त भागातील विशेष आर्थिक जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटना व सटाणा कृ.उ.बा. समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव यांनी केली आहे.

गेल्या वर्षात पावसाचे प्रमाण कमी असल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन घटले. त्यातही पिकविलेल्या शेतमालाला अपेक्षित भाव न मिळाल्याने आर्थिकदृष्ट्या शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शासनाने शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य तो भाव द्यावा.
– हरिअण्णा जाधव, कृ.उ.बा. समिती उपसभापती, सटाणा

Significant increase in the prices of seeds, fertilizers, medicines

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *