वाहतूक कोंडीत अडकले नाशिककर

रविवार कारंजा ते अशोक स्तंभ वाहने चालविताना नाकीनऊ

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील अशोक स्तंभ ते रविवार कारंजा रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे रामवाडी पुलावरून वाहनधारक जात असल्याने रामवाडी पूलही वाहतूक कोंडीने जॅम झाला आहे.
प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारक पर्यायी मार्गांचा वापर करत अंतर्गत रस्त्यावरून वाहने चालवत असल्याने प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. अंतर्गत रस्त्यांवर वाहनांची गर्दी होत असल्याने परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.
रस्त्यांवर पाइपलाइन टाकण्यासह ऑप्टिकल फायबर टाकण्याचे काम व रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली आहे. रविवार कारंजा व अशोक स्तंभ परिसरात अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. परिणामी नागरिक या पर्यायी रस्त्यांचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे परिसरात राहणार्‍या नागरिकांना वाहनांच्या कर्कश आवाजाचा सामाना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे रविवार कारंजावर वन-वे रस्ता असताना विरुद्ध दिशेने काही जण वाहने चालवत असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे. वाहतूक नियमांचे पालन व्हावे व वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठिकठिकाणी वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मात्र, बेदरकार वाहनधारक पोलिसांना न जुमानता चुकीच्या दिशेने वाहने चालवून वाहतूक नियमांचे पालन न करणे, असे प्रकार होत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनादेखील वाहतूक कोंडी सोडवणे कठीण जात
आहेे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विभागाने ठिकठिकाणी वॉर्डन नियुक्त केले आहेत. मात्र, वाहनधारक या वॉर्डनला जुमानत नाहीत. त्यातच उलट्या दिशेेने येणार्‍या वाहनधारकांमुळे या कोंडीत मोठी भर पडत आहे. अनेक वाहनधारक गल्लीबोळातील रस्त्यांचा आधार घेत असल्याने रविवार कारंजा भागातील गल्ल्यांंमध्ये कोंडी होत आहे.

अपघातांना निमंत्रण
रविवार कारंजा व अशोक स्तंभ परिसरातील होणारी वाहतूक कोंडी अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे. या परिसरात अनेक अपघात होत आहेत. विशेेष करून दुचाकीच्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना वाहनावरील नियंत्रण जाऊन अपघात होत असून, त्यामुळे अनेक वेळा वादाचे प्रसंग निर्माण होतात.

Nashik residents stuck in traffic jam

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *