जलतार्‍यांद्वारे एक कोटी लिटर पाणी मुरणार

काष्टी कृषी विज्ञान संकुलात ‘जलतारा अभियान’; भूजलपातळी वाढीस मदत

मालेगाव : प्रतिनिधी
भूजल पातळी वाढवून भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल, काष्टी येथे ‘जलतारा अभियान’ अंतर्गत जलसंधारणाचा मोठा उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सहकार्याने आयोजित या अभियानातून संकुल परिसरात 15 जलतार्‍यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याद्वारे सुमारे एक कोटी आठ लाख लिटर पाणी जमिनीत मुरण्यास मदत होणार आहे.
शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभियानाची अंमलबजावणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्च यांच्या नेतृत्वाखाली आणि संकुल प्रमुख डॉ. महानंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या अभियानाच्या नियोजन व अंमलबजावणीत तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे आणि कृषी सहाय्यक भाऊसाहेब आढाव यांनी पुढाकार घेतला.
यावेळी मालेगाव मनपाचे प्रभाग क्रमांक 1 चे सभापती विशाल पवार, डॉ. जतिन कापडणीस, हर्षल देसले यांच्यासह कृषी अभियांत्रिकीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सोमनाथ सोनवणे, प्रा. विवेक कानवडे (अन्न तंत्रज्ञान), डॉ. संजय पाटील (कृषी महाविद्यालय), डॉ. योगेश पाटील (कृषी व्यवसाय), डॉ. अनिल जगधनी (उद्यानविद्या), प्राचार्य डॉ. दिनेश बिरारी (कृषि तंत्रनिकेतन), डॉ. राहुल खुळे (रासेयो), विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. प्रशांत सोनवणे यांच्यासह संकुलातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कशा आहे जलतार्‍याची रचना?

संकुलाच्या प्रक्षेत्रावर प्रत्येकी 5 फूट लांब, 5 फूट रुंद आणि 6
फूट खोल अशा आकाराच्या जलतार्‍यांची निर्मिती करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, एका जलतार्‍यामधून पावसाळ्याच्या चार महिन्यांत सुमारे 3 लाख 60 हजार लिटर पाणी जमिनीत मुरते. यामुळे परिसरातील विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांची पाणीपातळी वाढून त्यांना दीर्घकालीन आधार मिळणार आहे.

शेतकरी व पर्यावरणासाठी लाभदायी

भूजल संवर्धन : जलतारा ही पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरवणारी अत्यंत प्रभावी रचना आहे. यामुळे भूजल पुनर्भरणाला मोठी चालना मिळते. शाश्वत शेती: या उपक्रमामुळे विहिरींमध्ये पाणी टिकून राहून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारेल आणि मृदेची धूपही कमी होईल.

 

One crore liters of water will be drained through water stars

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *