अल्पवयीन मुलीच्या विक्रीप्रकरणी मुख्य संशयिताला पोलीस कोठडी

नऊ संशयितांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन आदिवासी मुलीची विकी करणार्‍या दहा संशयितांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद करून न्यायालयात उभे केले. त्यातील मुख्य संशयिताला चार दिवसांची पोलीस कोठडी, तर इतर नऊ संशयितांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवाना केले.
या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मागील काही महिन्यात बेपत्ता झालेल्या मुलींची माहिती संकलित करण्याचे काम काही सामाजिक संस्थांनी सुरू केले आहे. पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलगी हरवल्याची तक्रार केली असता ती अपहरणाची म्हणून दाखल होते. मुलगी सापडल्यास नंतर न्यायालयीन आदेश मिळवून तिचा ताबा मिळवावा लागतो. त्यामुळे पालकांना नाहक मनस्ताप होत असतो.
वयात असलेल्या मुलींबाबत ती सज्ञान आहे, या कारणाने तिचे झालेले लग्न कायदेशीर ठरते. आदिवासी दुर्गम भागातील मुलींच्या पालकांच्या गरिबीचा व अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांचे लग्न जमवून देण्याच्या नावाने विक्रीचे प्रकार घडत असल्याने एल्गार कष्टकरी संघटनेसारख्या संस्था सतर्क झाल्या आहेत.
त्यांनी बेपत्ता झालेल्या त्र्यंबक, हरसूल, घोटी, इगतपुरी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलींची माहिती घेऊन त्यांची आजची स्थिती काय आहे, याचा मागोवा घेण्यास प्रारंभ केला आहे.
अनेकदा अल्पवयीन असलेली मुलगी कायद्याने सज्ञान होईपर्यंत लपवून ठेवले जाते. सज्ञान असलेली मुलगी घरातून निघून जाते व तीचे लग्न लावले जाते. अशा प्रकरणांमध्ये देखील संपूर्ण माहिती घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Police remand of main suspect in minor girl sale case

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *