केतनचा खून हा नियोजनबद्धरीत्या

संपूर्ण क्रूर कटाची मुख्य सूत्रधार सिया गोयल

पुणे : 
पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाला आता अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. पोलीस कोठडीत असलेल्या केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्या चौकशीतून रोज नवे आणि थक्क करणारे खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतनचा खून हा कुठल्याही रागाच्या भरात किंवा अचानक झालेला नसून, त्यामागे अनेक दिवसांचे अतिशय थंड डोक्याने केलेले क्रिमिनल प्लॅनिंग होते.
पोलीस तपासात सियाने गुन्ह्याची कबुली देताना सांगितले की, 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतनचा काटा काढण्यासाठी तिने आणि चेतनने आधीच एक सांकेतिक खूण (सिग्नल) ठरवली होती. योजनेनुसार, योग्य वेळ येताच सियाने केतनच्या समोर खाली वाकायचे होते, जेणेकरून मागे उभ्या असलेल्या चेतनला केतनला दरीत ढकलणे सोपे जाईल. त्या दिवशी दरीजवळ पोहोचताच सियाने तो सिग्नल दिला, ती खाली वाकली आणि मागून आलेल्या चेतनने केतनला थेट दरीत ढकलून दिले. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी स्पष्ट केले की, या संपूर्ण क्रूर कटाची मुख्य सूत्रधार खुद्द सिया गोयल
हीच होती.
तपासात समोर आलेली सर्वांत चक्रावून टाकणारी बाब म्हणजे, केतनला संपवण्यासाठी या दोघांनी एक नाही तर तब्बल तीन प्लॅन्स तयार ठेवले होते. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर 18 जून रोजी दुसरा प्लॅन अमलात आणून केतनची हत्या करण्यात आली. 18 जूनलाही केतन वाचला असता तर त्याला थेट रस्ते अपघातात मारण्याची तिसरी योजना सियाने आधीच आखून ठेवली होती. हत्येच्या दिवशी आरोपी किती तयारीनिशी आले होते, याची साक्ष लोहगडच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षक धीरज जाधव याने दिली. चौकशीदरम्यान सियाने पोलिसांकडे एक वेगळाच दावा केला आहे. ती म्हणाली, माझं आणि चेतनचं अफेअर आहे, हे मी केतनला स्पष्ट सांगितलं होतं. मला हे लग्न करायचं नाही आणि पळून जायचं आहे, असंही मी त्याला वारंवार सांगितलं होतं. पण केतन लग्न रद्द करण्यास तयार नव्हता. सियाच्या घरचे चेतनसोबतच्या नात्याच्या पूर्णपणे विरोधात होते. केतन हा गर्भश्रीमंत घरचा असल्याने तिच्या घरच्यांचा या लग्नासाठी सियावर प्रचंड दबाव होता. सिया आणि चेतन या दोघांनाही अमली पदार्थांचे व मद्यपानाचे व्यसन होते. म्हणूनच तिचे लग्न घाईघाईत लावून देण्याचा त्यांचा विचार होता.

Ketan’s murder was premeditated.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *