पावसाळ्यातील समस्या

हॅलो!, सखींनो नमस्कार,
असह्य करणारा उन्हाळा संपत आला आहे. आता आपल्याला पावसाळ्याचे वेद लागतील. उन्हाळ्यात घामामुळे आपल्याला अनेक आरोग्य आरोग्य विषयी समस्यांचा सामना करावा लागतो जसे की उन्हाळी लागणे, घामोळ्या येणे, शरीरावर पुटकुळ्या येणे. यातील काही समस्या आपल्या चुकीच्या लाइफस्टाइल मुळे आलेल्या असतात. काही समस्या आपण चुकीच्या किंवा अयोग्य अंतर्वस्त्र वापरल्या मुळे निर्माण झालेल्या असतात.
आता पुढच्या आठवड्यापासून पावसाळा ऋतु सुरु होणार आहे. पावसाळ्यामध्ये अनेक त्वचा विकार होण्याची शक्यता असते.
बराच वेळा अचानक आलेल्या पावसा मुळे आपल्याला ओले व्हावे लागते. ऑफिसला जाणार्‍या महिलांना या समस्या चा जास्त सामना करावा लागतो, आणि त्या ओल्या कपड्यावरचा त्यांना ऑफिस मध्ये बराच वेळ बसावे लागते. त्यामुळे बऱ्याच त्वचा रोगांची लागण होऊ शकते. त्यामुळे महिलांनी आपल्या जवळ नेहमी एक एक्स्ट्रा ड्रेस,अंतर्वस्त्र सहित जवळ बाळगावा.

हेही वाचा :नसबंदीकडे पुरुषांची पाठ, महिलांचाच शस्त्रक्रियेत पुढाकार

पुढील भागामध्ये आपण पावसाळा ऋतु मध्ये कोणते योग्य अंतर्वस्त्र वापरावे याबद्दल सविस्तर चर्चा करूयात. महिलांचे अंतर्वस्त्र आरोग्यविषयक समस्यांचे निवारणा बाबत योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. महिलांच्या अंतर्वस्त्र परिधाना संदर्भातील सुटणारे , न सुटणारे प्रश्न चुकीच्या सवयी किंवा फॅशनला बळी पडून वापरलेले अंतर्वस्त्र व त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांचे निवारण व योग्य मार्गदर्शन सध्याच्या मॉडर्न ( व्यस्त ) जिवनशैली पहाता होणारे घातक इनफेक्शन , रोग ( स्तन कॅन्सर ) इत्यादी टाळण्यासाठी योग्य अंतर्वस्त्र वापरण्याची माहिती प्रत्येक स्त्रीला असायलाच हवी .

सौ सोनल गांधी, पुणे
 Awerness Program in Ladies undergarments
(gandhirahulp@gmail.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *