लोहशिंगवे येथे अतिवृष्टीमुळे शेतकर्‍याची विहीर ढासळली

खरिपाच्या तोंडावर शेतकर्‍यावर दुहेरी संकट

देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी रामदास दगडू डांगे यांच्या शेतातील स्वतःच्या मालकीची विहीर कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे संबंधित शेतकर्‍यावर मोठे आर्थिक तसेच पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे.
गावातील पाणीपुरवठा योजनेचे पाणी नियमित उपलब्ध नसल्यामुळे डांगे कुटुंबीय पिण्याच्या पाण्यासाठी याच विहिरीवर अवलंबून होते. मात्र, अतिवृष्टीमुळे विहीर कोसळल्याने पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा स्रोतच बंद झाला आहे. खरीप हंगाम सुरू होत असताना पिकांच्या लागवडीसाठी आवश्यक असणारे सिंचनाचे पाणीही आता उपलब्ध राहिलेले नाही. त्यामुळे खरीप हंगामातील शेती कशी करायची, असा गंभीर प्रश्न शेतकर्‍यासमोर उभा राहिला आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडून आर्थिक मदत व विहिरीच्या पुनर्बांधणीसाठी विशेष अनुदान देण्याची मागणी शेतकरी रामदास दगडू डांगे यांनी केली आहे.

A farmer’s well collapsed at Lohshingve due to heavy rainfall.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *