नाशिक : प्रतिनिधी
मंजूर कामाचे देयक काढण्यासाठी दीड लाख रूपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता अमाेल घुगे यांना रंगेहाथ पकडण्यात आले
याबाबत अधिक मािहती अशी की, सिन्नर तालुक्यात राष्ट्रीय पेयजल याेजनेतून ठेकेदाला ५० लाख रुपयांचे काम देण्यात आले हाेते. या कामाचे देयक काढण्यासाठी घुगे यांनी २ लाख रुपयांची मागणी केली. संबंधित ठेकेदाराने दीड लाख रुपये देण्याचे कबूल केले. तसेच लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. शुक्रवारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागात सापळा रचण्यात येऊन घुगे यांना दीड लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.