सेलिब्रेशनमध्ये चाहते होऊ शकतात सहभागी, कसं ते जाणून घ्या …
अशोक सराफ येत्या 4 जूनला आपल्या वयाची 75 वर्षे पूर्ण करणार आहेत. त्यानिमित्तानं चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. अशोक सराफ यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होता येणार आहे. 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अष्टविनायक नाट्यसंस्था आणि परिवारातर्फे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात अशोक सराफ यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ अष्टविनायक संस्थेच्या व्हॅक्यूम क्लीनर नाटकात महत्त्वाची भूमिका करीत आहेत. या नाटकाचा शनिवारी 4 जून रोजी दादरमधील शिवाजी मंदिर नाट्यगृहात सकाळी 10.30 वाजता प्रयोग होणार आहे. या प्रयोगाच्या मध्यांतरादरम्यान अशोक सराफ यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय
‘व्हॅक्यूम क्लीनर’ या नाटकात अशोक सराफ यांच्यासोबत निर्मिती सावंत देखील महत्त्वाची भूमिका करीत आहेत. चिन्मय मांडलेकर यांनी या नाटकाचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे. आणि याच नाट्यप्रयोगादरम्यान पार पडणार्या सन्मान आणि सत्कार सोहळ्यात नाट्यरसिकांना सहभागी होता येणार आहे. महाराष्ट्र, गोवा, इंदूर इत्यादी ठिकाणी या नाटकाचे आतापर्यंत 300 हून अधिक प्रयोग झाले आहेत.