सातपूर : प्रतिनिधी
सातपूर औद्योगिक वसाहतीतील कार्बन नाका पॉवर हाउसजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अरफान चौधरी (वय 28, रा. दत्तमंदिर लिंक रोड) असे मृत युवकाचे नाव आहे.
सोमवारी (दि. 13) दुपारी सुमारे 12.20 वाजता अरफान चौधरी हे दुचाकीवरून सातपूर औद्योगिक वसाहतीतील कार्बन कंपनीजवळील पॉवर हाउस परिसरातून जात होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने भरधाव येणार्या एका दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अरफान यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने खासगी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने सोमवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, हा संपूर्ण अपघात परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. फुटेजच्या आधारे सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Youth injured in horrific accident dies during treatment.