सिन्नर :
तालुक्यातील जायगाव- ब्राम्हणवाडे रोडवर उभ्या ट्रकला शुक्रवारी (दि. 3) मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत ट्रक भस्मसात झाला.
सचिन संपत नागरे यांचा हा ट्रक असून मध्यरात्री एकच्या सुमारास घराबाहेर आगीचे लोट दिसू लागल्याने नागरे कुटुंबीयांना जाग आली. त्यांनी घाईघाईने घराबाहेर येऊन पाहिले असता दहा टायर असलेला उभा ट्रक (नं. MH-15-CK-2122 ) आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला होता. त्यांनी याबाबत सिन्नर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली.
त्यानंतर चालक नवनाथ जोंधळे, फायरमन लाला वाल्मिकी, जयेश बोरसे, लक्ष्मण सोनकुसरे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे दोन ते अडीच अडीच तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र ट्रक संपूर्ण जळून खाक झाला. आगीचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे.