नाशिकरोडला अतिक्रमण निर्मूलन मोहीम

मोबाइल शॉप, हॉटेल, ट्रॅव्हल्सचे शेड हटविले

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिका क्षेत्रातील नाशिकरोड, नवीन नाशिक, पूर्व, पश्‍चिम, सातपूर, पंचवटी या सहाही विभागांतील अतिक्रमणावर कारवाई केली जात आहे. सातपूर, पंचवटीनंतर आता नाशिकरोड विभागाकडे अतिक्रमण विभागाने आपला मोर्चा वळवला असून, गुरुवारी (दि.3) बिटको चौक परिसरातील तीन मोठे अतिक्रमण हटवत कारवाई करण्यात आली. याचबरोबर रस्त्यावर बसणारे हातगाडे, भाजीविक्रेते यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली. एसपी मोबाइल ऍक्सेसरीज शॉप, इंडियन फूड फोर्ट, सुशभी ट्रॅव्हल्स यांचे अनधिकृत पत्र्याचे शेड असे तीन मोठे अतिक्रमण काढण्याततगाडे, भाजीविक्रेते यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली. एसपी मोबाइल ऍक्सेसरीज शॉप, इंडियन फूड फोर्ट, सुशभी ट्रॅव्हल्स यांचे अनधिकृत पत्र्याचे शेड असे तीन मोठे अतिक्रमण काढण्यात आले.
नाशिकरोड परिसरात मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी अतिक्रमण करून अनधिकृतपणे पत्र्याचे शेड व पक्के बांधकाम करण्यात आले आहे. दरम्यान, हे अतिक्रमण लवकरच काढले जाणार असल्याचे उपायुक्त करुणा डहाळे यांनी म्हटले होते. त्यानुसार पालिका आयुक्त रमेश पवार यांच्या आदेशाने नाशिकरोड परिसरातील बिटको चौक परिसरातील सर्व्हे क्र. 131 परिसरातील हे अतिक्रमण उठवण्यात आले. यांसह छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, अण्णा हजारे मार्ग, राजेंद्र चौक, मस्जिद रोड, मुक्तिधाम, गायकवाड मळा, रेजिमेंट् प्लाझा येथील अनधिकृत फेरीवाले रस्त्यावर बसणारे भाजीवाले यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. नाशिकरोडचे विभागीय अधिकारी सुनील आव्हाड, अतिक्रमण विभागाचे अमित पवार, मयूर काळे, प्रभाकर अभंग, प्रमोद आव्हाळे आदींसह सातपूर अतिक्रमण विभाग, नवीन नाशिक विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून नाशिकरोड परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. मुक्तिधाम या गजबजलेल्या परिसरात हॉटेलचालकांकडून सकाळ व सायंकाळच्या वेळी थेट मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर टेबल -खुर्च्या टाकल्या जात असल्याने वाहतुकीला अडचण होते.
त्यामुळे हे अतिक्रमणदेखील हटवण्याची मागणी करण्यात येत होती. काही दिवसांपूर्वी कारवाई होणार म्हणून काही टपरीधारकांनी एक दिवस दुकाने लावली नाहीत. मात्र, दुसर्‍या दिवसापासून पुन्हा परिस्थिती ‘जैसे थै’ झाल्याचे दिसून आले. यासह नाशिकरोड परिसरात अनेकांनी मनमानी करत कोणत्याही भीतीविना अतिक्रमण थाटले आहे. अखेर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने तीन मोठे असलेले अतिक्रमण निष्कासित केले तर उर्वरित परिसरात रहदारीला अडथळे ठरणारेही अतिक्रमण काढले. नाशिकरोड परिसरात इतरही ठिकाणी जी अतिक्रमणे आहेत, तीदेखील काढण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *