नाशिक-पुणे एसटी बसचा अशोका मार्गावर अपघात

वडाळागाव : प्रतिनिधी
नाशिकहून पुण्याकडे जाणारी एमएच 14 बीटी 4426 क्रमांकाची विनाथांबा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) बस रविवारी दुपारच्या सुमारास अशोक मार्ग परिसरात रस्त्यालगत असलेल्या वृक्षाला धडकली. या अपघातात बसचे चालक, वाहक तसेच प्रवासी जखमी झाल्याची परिसरात
चर्चा होती.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, द्वारका सर्कलकडील अवजड वाहतूक रहिवासी भागातून वळविण्यात आल्यापासून या परिसरात वारंवार छोटे-मोठे अपघात घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
संबंधित प्रशासनाने तातडीने वाहतूक व्यवस्थेचा पुनर्विचार करून सुरक्षित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Nashik-Pune ST bus accident on Ashoka Marg.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *