मुंबई नाका पोलिसांनी काही तासांत केला गुन्ह्याचा उलगडा
वडाळागाव : प्रतिनिधी
मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या 12 तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत तब्बल 14 लाख 30 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. घरकाम करणार्या महिलेनेच मालकाच्या घरातून दागिने व रोख रक्कम चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. संभाजी चौक परिसरातील रहिवासी नमिता शैलेश राजहंस यांच्या घरातून 28 जुलै रोजी दुपारच्या सुमारास 14.30 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 20 हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली होती. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान घरात काम करणारी महिला दर्शना गंगाराम गांगड (वय 20, रा. चुंचाळे, अंबड) हिच्यावर संशय आल्याने पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.
पो. आयुक्त संदीप कर्णिक, पो. उपआयुक्त मोनिका राऊत, सहा. पो. आयुक्त प्रमोद वाघ आदींच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, पुंडित पवार, सहा. सुधीर पाटील आदींच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत गुन्हे शोध पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा शेख, रोहिदास सोनार, प्रदीप कडाळे, देवीदास गाढवे, पोलीस अंमलदार समीर शेख, राजेंद्र नाकोडे आदींनी ही कामगिरी पार पाडली.
Domestic worker stole jewellery worth ₹14.30 lakh.