खरीप पीकविमा योजनेचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा

कृषी अधिकारी डमाळे यांचे आवाहन

नांदगाव : प्रतिनिधी
प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत खरीप पीकविमा अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै असून, नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळण्यासाठी शेतकर्‍यांनी वेळेत पीकविमा भरणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांनी आपल्या पिकाचा विमा उतरून घ्यावा, असे आवाहन नांदगाव तालुका कृषी अधिकारी रवींद्र डमाळे यांनी केले आहे.
तालुक्यात कांदा, मका, कपाशी, सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडीद आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली असून, लागवड झालेल्या पिकांचा पीकविमा शेतकर्‍यांनी उतरून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

        दृष्टिक्षेपात…
पीक              पेरणी झालेले क्षेत्र (हे.)
मका – 41,600
बाजरी – 6,220
तूर – 580
मूग – 2,460
उडीद – 116
भुईमूग – 1740
सोयाबीन – 400
कापूस – 6299

एकूण सरासरी क्षेत्र-
62,390 हेक्टर
पेरणी झालेले क्षेत्र-
59,700 हेक्टर
झालेला एकूण पाऊस –
223 मि. मी.

Farmers should avail the benefits of the Kharif crop insurance scheme.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *