शरद पवार यांना खोत यांचा सल्ला
नाशिक : वार्ताहर
स्वतःला राज्यकर्ते म्हणवून घेता तर जनतेला न्याय पण द्या, जसे हार तुरे घेता तसे जनतेचे प्रश्न न सुटल्यास टिकेचा प्रहारही होणारच. त्यामुळे टीकाही सहन करा. वयाने ज्येष्ठ झाला असाल तर घरी बसा,आराम करण्याचा सल्ला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत व आ. गोपीचंद पडळकर यांनी दिला.
खोत व पडळकर यांनी काल शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला.तत्पूर्वी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन अभिषेक करीत दर्शन केले. यंदाचा खरीप हंगाम यशस्वी होऊ दे, अशी प्रार्थना केल्याचे खोत यांना यावेळी सांगीतले.
कांदा उत्पादाकांच प्रश्न गंभीर असून, त्याकडे शासनाने वेळीच लक्ष न घातल्यास राज्यभर भिक मागून ते भिकेचे पैसे कृषी मंत्र्यांना दिले जातील. तसेच मंत्रालायावर धडक दिली जाईल असा इशारा दिला. खरीप हंगामात कृषी अधीकारी, औषधेे कंंपन्या यांच्यांत साटेलोेटे होते. ते बियाणे खतांसाठी इतर औषध घेेण्याची सक्ती करतात. त्याकडे अधिकारी डोळेझाक करतात. त्यातून मलीदा कमवून वरपर्यंत पोहोचवितात, असा अरोप त्यांनी केला. आता तरी हे लुटीचे उद्योग बंद करा अशी मागणी त्यानी केली. कांदा प्रश्नावर धोरण तयार करावे, कांदा चाळ अनुदान , कांदा निर्यातीसाठी वाहतूक खर्चाला अनुदान दिले तर चांगला भाव मिळेल, माल तारण योजना, विना व्याज शेतकर्यांना कर्ज उपलब्ध करून राज्य सरकारकडे मागण्या केल्या आहेत.
खुळा राजा, गर्भगळीत जनता
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर त्यांनी खरमरीत टीका केली. खुळा राजा गर्भगळीत जनता अशी अवस्था राज्याची झाली आहे. उस, कांदा, दुध, वीजेचे भारनियमन अशा प्रत्येक प्रश्नावर शेतकरी आंदोल झाले. मात्र एकदाही मुख्यमंंत्री यांनी बैठक घेतली नाही. त्यावर ब्र शब्द उच्चारला नाही. काही मदत जाहीर केली नाही. अशी परिस्थिती राज्यात् प्रथमच झाल्याचे त्यांंनी सांगितले. शरद पवार आता ज्येष्ठ झाले आहे. त्यांच्यवर टीका करु नये. असे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे म्हटले जाते. त्यावर पडळकर यांनी संतप्त प्रतीक्रीया व्यक्त केली. वय झाले तर घरी बसा, राज्य कारभारातून अंग काढून घ्या, नतंर तुमच्यावर टीका करण्याची वेळ येणारच नाही असे ते म्हणाले.