बंदी घातलेल्या कापसाच्या बियाणांची विक्री भोवली

नाशिक : प्रतिनिधी
खरीप हंगाम लागत असल्याने शेतकर्‍यांकडून आतापासूनच शेतकर्‍यांची फसवणूक करण्याचे प्रकार काही कृषी विक्री केंद्राकडून समोर येत आहे. बंदी घातलेल्या कापसासह इतर पिकांच्या बियाणांची विक्रीचे प्रकार होत आहे. अशा विक्रेत्यांवर जिल्हा व विभागस्तरावर भरारी पथकाकडून धाडी टाकून कारवाइ केली जात. नुकतीच अशीच कारवाइ नाशिकच्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयालाच्या भरारी धुळे जिल्हयातील नगाव येथे बंदी घातलेल्या एसटीबीटी तेजस या कापसाच्या बियाणाची विक्री करणार्‍या खंडु संतोष पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक विभागीय कृषी सहसंचालकतथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, अधिक्षक कृषी अधिकारी प्रमोद वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.डी.मालपूरे, कृषी विकास अधिकारी पी.एम.सोनवणे, तंत्र अधिकारी संजय शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जळगावचे जिल्हा गुणवत्त्ता नियंत्रक निरीक्षक अरुण तायडे यांच्या सहकार्याने संशयित पाटील विरोधात पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात नाशिक विभागाचे विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील यांनी पाटील यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. गोपनीय माहितीनुसार संबंधित संशयित व्यक्ती विक्री केद्रातून बंदी असलेल्या तेजस नावाचे कापसाच्या बियानांची विक्री करीत असल्याचे समजले. त्यानुसार भरारी पथकाने या दुकानावर धाड टाकली. यावेळी दुकानातून 48 हजारांची 32 पाकीटे जप्त करण्यात आली. यावेळी कारवाई करताना जिल्हा भरारी पथकातील सदस्य मोहीम अधिकारी प्रदीप निकम, कृषी अधिकारी पं.स.रमेश नेतनराव,कृषी अधिकारी पं.स.अभय कोर हे उपस्थित होते. नाशिकसह विभागात खरीप हंगाम सुरू होणार असल्याने या पार्श्‍वभूमीवर सर्वच कृषी विक्री केद्रात कृषी साहित्य खरेदी करण्यासाठी आतापासून शेतकर्‍यांची गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांच्या अज्ञानाचा काहीजन फायद्दा घेउन बियाणांची विक्री करताना त्यांची फसवणूक करतात. मात्र अशा दुकानावर कृषी विभागाची नजर असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *