– अॅड. प्रतीक्षा चौधरी
मी रिक्षाची वाट बघत उभे होते. एक रिक्षा दोन मिनिटं माझ्यासमोर येऊन थांबली मी विचारणार तेवढ्यात एक वयोवृद्ध आजीने म्हटले ही माझी ओला आहे. जरा हसू आलं जरा बरंही वाटलं; कारण यांच्या वयाच्या लोकांना गरजही असते असे अॅप्स जमण्याची. इमर्जन्सी पटकन वाहन मिळण्याची. अॅप वापरता येणं म्हणजे एक आधुनिकतेचं चांगलं प्रतीक. पण मोबाइलचा उपयोगाऐवजी दुरुपयोग हा प्रत्येक पिढीतल्या प्रत्येक व्यक्तीने करून घेतलाय. मोबाइल ही खरंतर अत्यावश्यक सुविधा तेव्हा तुम्हाला कुणाशी संपर्क करायचा आहे. काहीतरी सांगायचे, कुठेतरी जायचं परंतु तरुण पिढी आणि बालपिढीप्रमाणेच वयोवृद्धसुद्धा मोबाइलच्या अधीन गेलेले दिसतात ही गोष्ट अत्यंत वाईट.
आधीची आजीबाई म्हणजे मुलांसाठीचा गोष्टींचा खजिना. खरं तर झोप आणि गोष्ट ही एक सांगडच होती. मुलं खेळून थकली दमली की आजीजवळ गोष्ट ऐकायची आणि झोपी जायची. दिवसासुद्धा तिच्या गाण्यांनी तिच्या ओव्यांनी ऐकत आपल्या बालपण भिरभिरत मोठं करायचे.
दिवस बदलले आणि सारं काही बदललं. आताची आजी गाणे, ओव्यात नाहीतर मोबाइलमध्ये रमते. ऐकायला कडू पण सत्य आहे. एकवेळ तरुण पिढी कंट्रोल करते की आपली मुलं मोबाइल बघून आहेत म्हणून आपण जरा फोन कमी करूया पण ही लोकं काही फोन बघायची थांबत नाहीत आणि कडवट असला तरी सत्य बर्याच परिवारात आई-वडील हे जॉबला असल्यामुळे ते सकाळी आपल्या कामावर निघून जातात आणि दिवसभर मुलं हे आजी-आजोबांच्या भरोशावर असतात. पूर्वी त्यांना मंदिरात नेऊन बागेत नेऊन त्यांना श्लोक शिकवून त्यांचं बालपण घडवलं जायचं, पण आता ते खूप बदललेलं दिसतं. जर मुलांचे काळजी घेणारेच मोबाइलमध्ये बहुदा बराच वेळ घालवत असतील तर मुलेही आपोआप त्यांच्यामुळे मोबाइल बघायला लागतात. मुली शांत होत नाही म्हणून त्याच्या हातात मोबाइल देणं हा कोणता पर्याय आहे.
आपल्याला लहानपणी कुठे होता मोबाइल? चंदामामा, गोठ्यातल्या गायी, जाणार्या-येणार्या मोटार गाड्यांची गंमत बघत कुठे ते बालपण वाढून जायचं कळायचंच नाही. पण आता ते मोबाइलमध्ये हरवून गेलं.
सार्याच पिढीतले सारेच मोबाइलचे अधीन झाले. त्यामुळे लहान मुलांना दोष देतात आणि ते मोबाइल बघतात कारण तो दोष देण्याआधी तुम्ही स्वतः किती मोबाइल बघताहेत हे एकदा तपासून बघावं. घरातल्या मोठ्यांनी मुलांना पुस्तक वाचण्याच्या रंगीबेरंगी चित्र बघण्याच्या कविता, गाणे, श्लोक म्हणण्याच्या सवयी लावल्या पाहिजेत जेणेकरून मुलंही आधुनिक आणि संस्कार घडतील. जर आपण मोबाइलमध्ये वेळ घालवू तर कसं घडवायचं.
आजीबाई आणि आजीबाईचा बटवा ही उपमा म्हणजे आजीबाईला अनेक प्रकारचे औषधसुद्धा पूर्वीच्या काळी माहीत असायची. घरातल्या विविध वापरातल्या वस्तूंतूनच काहीतरी औषधे निर्माण करून लहान मुलांवर त्यातून विविध औषधोपचार करण्याचे पण आता तीही कला हरवत चालली आहे. कारण ते म्हणताना मोबाइल आला की सगळाच भाव विरस होतो आणि नात्यात या मोबाइलमुळे वाढणारी दरी ती वेगळीच. वृद्ध आणि तरुण यात याचे सर्वांचे हे मोबाइलमागे धावणे लहानग्यांच्या बालपणाला कुठेतरी हिरावून घेण्यासारखे आहे आणि स्वतःच त्यांना मोबाइलच्या अधीन करणे आहे.
Grandma and the Mobile Phone