नाशिक : कौटुंबिक वादातून पत्नीवर चाकूने वार करुन पतीने तिसर्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. यात पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
राजू रतनसिंग ठाकूर (50) रा. लक्ष्मी रेसिडेन्सी, रामकृष्णनगर मखमलाबाद शिवार यांचा त्यांची पत्नी संध्या ठाकूर हिच्याशी कौटुंबिक कारणावरुन वाद झाले. भांडण विकोपाला गेल्याने राजू ठाकूर यांनी पत्नीवर चाकूने वार केले. आणि स्वत: तिसर्या मजल्यावरील सदनिकेच्या बाल्कनीत जाऊन खाली उडी घेतली. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली असून, उपचारार्थ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.