राशिभविष्य

बुधवार, ८ जून २०२२.

जेष्ठ शुक्ल अष्टमी. ग्रीष्म ऋतू. उत्तरायण. शुभकृत नाम संवत्सर.

राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०

चंद्रनक्षत्र – उत्तरा फाल्गुना (दुपारी ०३.५६ पर्यंत)

“आज उत्तम दिवस, *दुर्गाष्टमी, बुधष्टमी* आहे” सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश. वाहन गाढव. पाऊस येऊ शकत

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दिवसाचा उत्तरार्ध अधिक अनुकूल आहे. महत्वाची कामे दुपारी ११ नंतर करावीत. कौटुंबिक सुख मिळेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) घरात काही महत्वाचे बदल कराल. कामात लक्ष द्यावे लागेल. आज महत्वाचे करार नकोत.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मन प्रसन्न राहील. सकाळी कामे मार्गी लागतील. आरोग्यचे प्रश्न निर्माण होऊ शकतात.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सुखाची अनुभूती मिळेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. उत्तरार्ध अनुकूल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक नियोजन कराल. कामानिमित्त भ्रमंती होईल. बौद्धिक चमक दाखवाल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सकाळी ११ नंतर महत्वाची कामे करा. नवीन जबाबदारी अंगावर येईल. मेजवानी मिळेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सकाळच्या सत्रात महत्वाची कामेपूर्ण करा. कामाचा ताण वाढेल. संध्याकाळी पुरेसा आराम करा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. सन्मान होईल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्मानंद मिळेल. गुरुची अनुभूती येईल. कर्ज घेऊ नका. फेडताना त्रास होऊ शकतो.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) वरिष्ठ नाराज होऊ शकतात. व्यसने टाळा. शेअर्स मध्ये जपून गुंतवणूक करा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सकाळी महत्वाची कामे उरकून घ्या. कौटुंबिक प्रश्न सोडवावे लागतील. संध्याकाळ विश्र्नातीची.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होऊ लागतील. कुलदेवतेचे दर्शन घ्या.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *