तामिळनाडू सरकार नवजात बालकांना सोन्याची अंगठी देणार

चेन्नई :
तामिळनाडूचे मुख्यमंत्री सेवांचा लाभ लोकांनी घेण्यासाठी आणि त्यावरील लोकांचा विश्वास वाढावा यासाठी नवी योजना आणली आहे. तामिळनाडूमध्ये सरकारी रुग्णालयामध्ये जन्म घेणार्‍या नवजात बालकांना सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी 220 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 1 लाख 28 हजार अंगठ्यांसाठी ऑर्डरदेखील देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
सोन्याच्या 128499 अंगठ्यांची ऑर्डर देण्यात आली आहे. तामिळनाडू सरकारने या योजनेसाठी एका वर्षासाठी 755.83 कोटी रुपयांची तरतूद केली असून, त्यातून एका वर्षात 441667 सोन्याच्या अंगठ्यांचे वाटप केले जाईल. तामिळनाडू सरकारच्या या योजनेसाठी 128499 सोन्याच्या अंगठ्यांचा पुरवठा जोयलुक्काज आणि कल्याण ज्वेलर्स यांच्याकडून केला जाणार आहे. जोयलुक्काज यांच्याकडून 89949 अंगठ्या आणि कल्याण ज्वेलर्सकडून 38550 अंगठ्यांचा पुरवठा केला जाईल. तामिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशनकडून याबाबत ऑर्डर देण्यात
आली आहे.

The Tamil Nadu government will give a gold ring to newborn babies.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *