ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक

मिरवणूक मार्गावर आकर्षक सजावट व रोषणाई

जुने नाशिक : वार्ताहर
पैगंबर जयंती अर्थात, ईद-ए-मिलादुन्नबीनिमित काल (दि.26) दुपारी चारला चौक मंडई येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीच्या सुरुवातीस देशात व शहरात शांतता नांदावी व देशाची प्रगती घडावी, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते खतीब-ए-शहर हाफिज हिसामुद्दिन अशरफी व उलेमांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात येऊन मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.
दरम्यान, जयंतीच्या पाश्वर्र्भूमीवर शहरातील मुस्लिमबहुल भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणूक मार्गावर, तसेच संपूर्ण परिसरात आकर्षक सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आल्याने हा परिसर उजळून निघाला होता. मध्यरात्रीपर्यंत अनेक भागांत डीजे सुरू होते. काही उत्साही युवकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
सुन्नी मर्कजी सीरत कमिटीतर्फे काल दुपारी मुख्य मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. यावेळी मीर मुख्तार अशरफी, नायब काजी-ए-शहर एजाज काझी, पोलिस हेडक्वार्टर मशिदीचे मुख्य इमाम मौलाना महेबूब आलम, जहांगीर मशिदीचे मुख्य इमाम मौलाना शरीफ सय्यद, मौलाना जफर खान, भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश चौधरी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, अशोक पंजाबी, माजी नगरसेवक गुलजार कोकणी, शेखन खतीब, मोहम्मदअली सय्यद, इकबाल टेलर, मखदुम काझी, बाबा खतीब, जाकिर सय्यद, अकील सय्यद, तबरेज शेख, इमरान मिर्झा, फारुक पठाण, युनूस तांबोळी, साजिद खान, अब्दुल्ला कोकणी, सहाफी मोहम्मद रजानुरी, अ‍ॅड. अमजद मकरानी आदी उपस्थित होते.
मिरवणुकीच्या अग्रभागी जामिया अहलेसुन्नत सादिकुल उलूमचे विद्यार्थी शिस्तबद्ध पद्धतीने निवडणुकीत सामील होते.
सायंकाळी सहा वाजता सारडा सर्कल येथे जुने नाशिकबाहेरील मिरवणूक एकाच वेळेस पोहोचल्याने या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. सारडा सर्कल येथील चांदशाहवली बाबा चौकात अन्नदानाचा कार्यक्रम झाला. रात्री उशिरापर्यंत मशिदीतून धार्मिक कार्यक्रम सुरू होते. पहाटे नात-ए-पाक व सलामपठण झाले. मिरवणुकीपूर्वी दुपारी बागवानपुरा येथे व मिरवणुकीनंतर बडी दर्गाह येथे अन्नदान करण्यात आले.

Procession of Eid-e-Miladunnabi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *